संतापजनक : कापसाला ४०० ज्यादा भाव देण्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । अधिक भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत आहेत. अश्यावेळी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम एका व्यापाऱ्याने केले आहे.

यावल तालुक्यातील वड्री या गावात शेतकर्‍यांकडून कापूस खरेदीसाठी बोदवड येथून व्यापारी आला. जादा भावाचे आमिष दाखवत व्यापारी मापात पाप करीत असल्याचे शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकर्‍यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले व बाजार समितीला माहिती दिली.

बाजार समितीचे पथक पोहोचल्यावर व्यापारी तेथून पसार झाला. दरम्यान त्याचा काटा जप्त करण्यात आला असून क्विंटल मागे तो चार किलोची चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. हा काटा आता वैद्यमापन निरीक्षकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

वड्री ता. यावल या गावात शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 400 रुपये जादाच्या भावाने आमिष दाखवत बोदवड येथील एक व्यापारी कापूस खरेदी करीत होता. दरम्यान त्याच्या वजन काट्यात फरक असल्याचा संशय शेतकर्‍यांना आला तपासणी केली असता. हा व्यापारी एका क्विंटल मागे चार किलो जादाचा कापूस मोजत होता. हा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी व्यापार्‍यास धारेवर धरले व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली.

घाबरून व्यापारीने तेथुन पळ काढला व बाजार समितीच्या पथकाने घटनास्थळी जावुन पंचनामा करीता वजन काटा जप्त करीत तो वैद्यमापन निरीक्षकांकडे तांत्रिक तपासासाठी पाठवला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी दिली.