जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२६ । देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसला आहे. एकीकडे महागाईने डोकं वर काढलं असून त्यातच आता दूधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने अमूल दूध आणि मदर डेअरीच्या दुधामध्ये प्रति लिटर २ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १४ मे २०२६ पासून देशभरात लागू होतील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जनावरांचे खाद्य, पॅकेजिंग आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईच्या या काळात, या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊ शकतो. मे २०२५ नंतर दुधाच्या दरात झालेली ही पहिलीच दरवाढ आहे. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे जी सर्वसाधारण अन्नधान्य महागाई दरापेक्षा कमी आहे.मदर डेअरीने परिपत्रक काढत सांगितले की, गेल्या वर्षात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या दरामध्ये ६ टक्के वाढ झाली असून ग्राहकांवरील भार कमी करण्याचे सर्व प्रयत्न करून ही दरवाढ करण्यात आली आहे.

अमूल दूधाचे दर –
अमूल फ्रेश (५०० मिली) – आधी २८ रुपये, आता २९ रुपये
अमूल फ्रेश (१ लिटर) – आधी ५५ रुपये, आता ५७ रुपये
अमूल शक्ती (५०० मिली) – आधी २९ रुपये, आता ३० रुपये
अमूल गोल्ड (५०० मिली)- आधी ३१ रुपये, आता ३२ रुपये
अमूल ए२ म्हशीचे दूध (१ लिटर) – आधी ६३ रुपये, आता ६६ रुपये
अमूल गायीचे दूध (५०० मिली) – आधी ३४ रुपये, आता ३५ रुपये
अमूल स्लिम अँड ट्रिम (५०० मिली)- आधी ३७ रुपये, आता ३९ रुपये
मदर डेअरीच्या दूधाचे दर –
बल्क वेंडेड मिल्क – आधी ५६ रुपये, आता ५८ रुपये
फुल क्रीम मिल्क – आधी ७० रुपये, आता ७२ रुपये
टोन्ड मिल्क – आधी ५८ रुपये, आता ६० रुपये
डबल टोन्ड मिल्क- आधी ५२ रुपये, आता ५४ रुपये
गाईचे दूध – आधी ६० रुपये, आता ६२ रुपये
प्रो मिल्क – आधी ७० रुपये, आता ७२ रुपये










