जगासाठी गूड न्यूज! तेल संकट संपणार? होर्मुज खाडीतून २४ तासांत २६ जहाजे रवाना!

मे 21, 2026 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावामुळे होर्मुज खाडीतील हालचालींवर मोठा परिणाम झाला असून जागतिक ऊर्जा बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची वाहतूक या खाडीमार्गे होत असल्याने अनेक देशांवर ऊर्जा संकटाचे सावट गडद झाले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर जगासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Strait of Hormuz

युद्धाच्या भडक्यामुळे गेल्या १३ आठवड्यांपासून ठप्प असलेली जगातील सर्वात महत्त्वाच्या होर्मुज खाडीत (Strait of Hormuz) पुन्हा एकदा जहाजांची ये-जा दिसतंय. इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत तेलवाहू आणि कंटेनर जहाजांसह तब्बल २६ व्यापारी जहाजांना या जलमार्गातून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मोठ्या घडामोडीमुळे कच्च्या तेलाच्या तुटवड्याशी झगडणाऱ्या जगाला आणि विशेषतः भारताला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. तेलाचे भाव सतत वाढत असल्याने जगाच्या जवळपास देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारतातही मोठा तुटवडा निर्माण झाला. भारत कोणत्याही पद्धतीने भारतात अधिका अधिक कच्चे तेल कसे आणले जाईल, याचा प्रयत्न करत आहे. तब्बल इतक्या दिवसांनंतर होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा सुरू झाली. होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनेक जहाजांवर हल्ला करण्यात आला.

जरी २४ तासांत २६ जहाजांना सोडून इराणने सकारात्मक पाऊल उचलले असले, तरी इराण आणि अमेरिकेतील तणाव अद्याप पूर्णपणे निवाळलेला नाही. हा मार्ग असाच सुरक्षित सुरू राहिला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वेगाने खाली येतील आणि जगावरील मंदीचे सावट दूर होण्यास मदत होईल. मात्र, हे युद्ध पूर्णपणे थांबले नाही, तर भविष्यात याचे आणखी भयंकर परिणाम जगाला भोगावे लागतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now