खरेदीदारांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण

जुलै 6, 2026 12:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२६ । सोन्या-चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून घरगुती बाजारातही मौल्यवान धातू स्वस्त झाले आहेत.

gold silver 2 jpg webp

सोने १ हजाराने तर चांदी तब्बल ५००० रुपयांनी स्वस्त!

goodreturns च्या माहितीनुसार आज बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात (प्रति १० तोळे) १,००० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीनेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. चांदीच्या दरात प्रति किलो (१००० ग्रॅम) मागे तब्बल ५,००० रुपयांची मोठी कपात झाली आहे. लग्न सराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे.

आजच्या घसरणीनंतर २४ कॅरेट सोने १ तोळा सोन्याचा दर १,४६,६२० रुपयांवर तर १० तोळ्यांचा दर १४,६६,२०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे १००० ग्रॅम चांदीचा दर २,४५,००० रुपयावर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now