डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

जुलै 5, 2026 6:01 PM

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालशल्यचिकित्सा व बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांची इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स अंतर्गत कार्यरत सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमूळे मानाचा तुरा खोवला गेला.

dr milind joshi

सोसायटी ऑफ पेडिएट्रिक युरोलॉजी ही देशातील लहान मुलांच्या मूत्र रोग संबंधी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांची देशातील सर्वात अग्रणी संस्था आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रात दीर्घकाळापासून विशेषतः लहान मुलांमधील मुतखड्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि मूत्ररोग विकार यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या डॉ. जोशी यांनी आपल्या ज्ञान, अनुभव, संशोधनवृत्ती आणि उत्कृष्ट रुग्णसेवेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. जोशी यांनी लहान मुलांमधील मुतखड्यांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या देश अँड विदेशातही यशस्वी रित्या केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉ. जोशी यांच्या निवडीमुळे बाल मूत्ररोग उपचार, संशोधन, वैद्यकीय शिक्षण तसेच आधुनिक उपचार पद्धतींच्या प्रसाराला अधिक गती मिळणार असून, देशभरातील बालरुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.

या निवडीबद्दल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांचेसह विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. मिलिंद जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या समर्पित सेवाभाव, नेतृत्वगुण आणि वैद्यकीय उत्कृष्टतेमुळे बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now