शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ, केंद्राचा २.६ लाख कोटींचा मेगाप्लॅन

मे 14, 2026 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाशी संबंधित प्रमुख निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

MSP

मंत्रिमंडळाने खरीप विपणन हंगाम २०२६-२७ साठी किमान आधारभूत किंमत (MSP) कार्यान्वयनासाठी विक्रमी २.६ लाख कोटी रुपयांना मंजुरी दिली. या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी हमीभाव मिळवून देणे आणि प्रमुख पिकांसाठीची सरकारी खरेदी प्रणाली अधिक मजबूत करणे हा आहे.

सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वात मोठी वाढ सूर्यफूल बियाण्यांसाठी असून, त्यात प्रति क्विंटल ६२२ रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर कापूस (प्रति क्विंटल ५५७ रुपये), नायजर बियाणे (प्रति क्विंटल ५१५ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५०० रुपये) यांच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस (मध्यम धागा) ६.८६ %, लांब धागा ७.२२%, धान (साधारण) ३.०३%, धान (ग्रेड १) ३.०१% मका ०.४%, तूर -५.६२%, उडीद ५.१२%, सोयाबीन ७.१२% वाढ करण्यात आली आहे. धान्य पिकांमध्ये, सामान्य भातासाठी २,४४१ रुपये आणि ग्रेड ए भातासाठी २,४६१ रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून दोन्हीमध्ये ७२ रुपयांची वाढ झाली आहे. हायब्रीड ज्वारीसाठी ३,४२३ रुपये आणि मालदांडी ज्वारीसाठी ३,४७१ रुपये भाव मिळणार असून यात १२४ रुपयांची वाढ आहे.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक संभाव्य नफा मुगासाठी ६१% असण्याचा अंदाज आहे. यानंतर बाजरी आणि मक्यावर ५६-५६% आणि तूर/अरहरवर ५४% नफा अपेक्षित आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now