⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Election Results : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात भाजप तर पंजाबमध्ये आपची बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील ५ विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून जवळपास चित्र स्पष्ट झाले आहे. उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा जादुई आकडा पार करण्यात यशस्वी ठरली आहे तर पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात देखील भाजपने मोठे यश मिळवले आहे.

देशात सर्वाधिक विधानसभा उमेदवार असलेले राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजप आणि सपा जोरदार प्रचाराला लागले होते. यूपीत सत्तांतर होणार अशी चर्चा सुरु असताना पुन्हा भाजपने बाजी मारली आहे. योगी सरकारचा करिश्मा चालला असला तरी अखिलेश यादव यांच्या सपाने देखील चांगली बाजी मारली आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात भाजपचा करिष्मा चालला आहे तर पंजाबमध्ये आपचा झाडू जोरदार चालला असून सर्वांचाच सुपडा साफ झाला आहे.

सध्या हातात असलेले निकाल पुढीलप्रमाणे :
उत्तरप्रदेशात एकूण ४०३ जागांसाठी लढत होती. त्यात भाजप २६७, सपा १२४, बसपा ५, काँग्रेस ४, इतर ३ ने आघाडीवर आहे.
उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी लढत होती. त्यात भाजप ४२, काँग्रेस २५, इतर २, बसपा १ ने आघाडीवर आहे.
पंजाबमध्ये ११७ जागांसाठी लढत होती. त्यात आप ९०, काँग्रेस १७, शिरोमणी अकाली दल ६, भाजप ३ ने आघाडीवर आहे.
मणिपूरमध्ये ६० जागांसाठी लढत होती. त्यात भाजप २९, इतर १२, काँग्रेस १०, एनपीपी ९ ने आघाडीवर आहे.
गोव्यात ४० जागांसाठी लढत होती. त्यात भाजप १८, काँग्रेस १२, टीएमसी ४, आप ३, इतर ३ आघाडीवर आहे.