नाशिक विधान परिषदेत महायुतीला जोरदार धक्का! भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा विजय

जून 22, 2026 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२६ । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी सोमवारी सकाळी पार पडली. या निवडणुकीत महायुतीने बहुतांश ठिकाणी वर्चस्व राखत मोठे यश मिळविले. जळगावसह अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. मात्र राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

gite

नाशिकमध्ये महायुती तथा शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळविला. पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत गोकुळ गीते यांनी विजय निश्चित केला. त्यामुळे नाशिकमधील निकाल हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन यांनी दोन्ही गीते बंधुंची समजून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गोकुळ गीतेंना समजावलं. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला. पण अखेरीस निकाल गीतेंच्या बाजूने लागला. या निकालामुळे नाशिकच्या राजकारणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीत मिळाली 357 मतं. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली. मोजणी प्रक्रियेत 13 मतं अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 303 चा कोटा ठरलेला. पहिल्या फेरीतच कोटा पूर्ण झाल्याने दुसरी फेरी होणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now