⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

दूध संघ निवडणूक : आता लक्ष माघारीकडे

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. सोमवारी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीत दिग्गज आमने- सामने असल्याने या लढतीत आता २८ नोव्हेंबरपर्यंत माघारीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच विविध पक्षांच्या नेत्यांकडून दूध संघ ताब्यात घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर या हालचालींना अधिक वेग आला. उमेदवारी दाखल करताना दिग्गजांनी एकमेकांना आव्हान दिले असून कोणाचे उमेदवारी अर्ज वैध तर कोणाचे अवैध ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. ११ नोव्हेंबर रोजी छाननी झाली, मात्र याबाबत १४ पात्र उमेदवारांना २९ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे.

नोव्हेंबर रोजी निर्णय देण्यात येऊन सकाळी ११ वाजता वैध अर्जांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २८ नोव्हेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे.