सणासुदीसाठी भुसावळमार्गे विशेष ट्रेनची घोषणा ; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

सप्टेंबर 18, 2026 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशात सणासुदीचे दिवस म्हटले की, रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची ही वाढती मागणी आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद–सांतरागाछी–अहमदाबाद विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळला थांबा देण्यात आला असला आहे. मात्र, जळगाव स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

train

अहमदाबाद–सांतरागाछी विशेष गाडीची सेवा

०२८३३ अहमदाबाद–सांतरागाछी विशेष गाडी २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी अहमदाबाद स्थानकावरून रवाना होणार आहे. विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी सांतरागाछी येथे पोहोचणार आहे.

तर ०२८३४ सांतरागाछी–अहमदाबाद विशेष गाडी २० सप्टेंबर रोजी रविवारी पहाटे १२ वाजून १५ मिनिटांनी सांतरागाछी येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.

नंदुरबार, भुसावळला थांबा; जळगाव मात्र वगळले

या विशेष गाडीला दोन्ही दिशेने आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

नंदुरबार आणि भुसावळला थांबा मिळाल्याने खान्देशातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, जळगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर या विशेष गाडीला थांबा न मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहेत. सणासुदीच्या काळात जळगाव स्थानकावरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या गाडीला जळगाव येथेही थांबा मिळावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

एसी ३ टियर, शयनयान आणि सामान्य डबे

प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी ३ टियर), शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना आपल्या गरजेनुसार प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. या विशेष गाडीचे आरक्षण १८ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. प्रवाशांना सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून आरक्षण करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now