जळगावच्या चिमुकल्याची स्केटिंगमध्ये धडाकेबाज कामगिरी; ३ पदकं जिंकत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सप्टेंबर 17, 2026 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावचा चिमुकला स्केटिंगपटू देवांश प्रविण पाटील याने आपल्या वेगवान आणि दमदार कामगिरीच्या जोरावर स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गोवा येथील पणजीमध्ये नुकतेच झालेल्या नॅशनल मॅचेसमध्ये देवांशने तब्बल तीन पदकांची कमाई करत आपल्या शाळेसह जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

devansh patil

देवांश हा ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड येथे इयत्ता दुसरी (गोदावरी) मध्ये शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत त्याने स्पीड रेसमध्ये तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ मेडल, रिले रेसमध्ये प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड ट्रॉफी, तर स्केटॅथलॉनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले.

श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

देवांशच्या या उल्लेखनीय कामगिरीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे देवांशच्या यशाकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणून पाहिले जात आहे. लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळाल्याने देवांशच्या कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सत्कार

देवांशच्या या यशाबद्दल आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवांशचे वडील प्रविण संतोष पाटील, आई प्रियंका प्रविण पाटील, आजी वंदना पाटील, ॲड.अरविंद पाटील, ॲड.सी.आर.पाटील तसेच प्रशिक्षक संजय पाटील उपस्थित होते.यावेळी ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्डच्या वतीने प्राचार्य श्रीधर सूनकारी, उपप्राचार्या रजनी गोजेरेकर मॅडम, वर्गशिक्षिका चित्रा पाटील मॅडम आणि स्पोर्ट शिक्षिका प्रमिला बागुल यांनी देवांशचे अभिनंदन केले.

तसेच ट्युशन क्लासच्या शिक्षिका स्वाती राहुल गोलेचा, प्राजक्ता चिंतामणी वैद्य आणि हर्षाली विनोद अनपट यांच्यासह परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांनी देवांशला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई आणि आता थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळालेल्या देवांशकडून श्रीलंकेतील स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now