शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नोव्हेंबर 14, 2022 7:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळ जळगाव कडून रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यात शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांच्याकडून आलेल्या चेकचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच मंडळाकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून सत्कार ही करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जळगाव शहरातील धनाजी नाना काॅलेजचे प्राध्यापक संदिप शामकांत जोशी हे होते.

jalgaon 2022 11 14T193619.402 jpg webp

सर्व प्रथम संदिप जोशी व मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांचे हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यारपण करण्यात आले . मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांनी प्रास्ताविक करतांना संस्थेची माहिती उपस्थितांना करून दिली. एकूण १५ विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. यात शैक्षणिक उपलब्धी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह चित्रा राजेश नाईक या अंतर राष्ट्रीय साँफ्ट बाँल खेळाडूला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक संचालनालयाचा , महाराष्ट्र जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला म्हणून विशेष सत्कार ही या प्रसंगी करण्यात आला. संदिप जोशी सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होण्यासाठी पंचसुत्री सांगीतली व त्याचा उपयोग केल्यास आपण यशस्वी होवू शकाल असे सांगीतले. संदिप जोशी सरांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधला.

या प्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा मिनाक्षी जोशी , उपाध्यक्ष अजय डोहोळे,सचिव संदिप कुळकर्णी , कार्यकारणी सदस्य कमलाकर कुळकर्णी , प्रसन्न जोशी , सुरेश भट , राजेश शांताराम कुळकर्णी , राजेश नाईक , रेवती याज्ञिक, राजेश चंद्रकांत कुलकर्णी , उल्हास जोशी व मंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ याज्ञिक यांचे सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन पल्लवी कुळकर्णी व संदिप कुळकर्णी यांनी केले तर आभार मिनाक्षी जोशी यांनी मांनले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now