यावल – विरावली रस्त्यावर ॲपेरिक्शाचा भिषण अपघात : एक ठार, दोन गंभीर जख्मी

ऑक्टोबर 16, 2022 10:24 AM

accident erandol jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । विरावली ते यावल रस्त्याच्या दरम्यान काल शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम एच १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षा ने प्रवास करीत असतांना विरावली ते यावल दरम्यान ऑटो रिक्शा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ऑटो रिक्षा रस्त्याच्या बाजुस असलेल्या खड्ड्यात पडून पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात एक ठार तर दोन जणं गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान जखमींना उपचारासाठी प्रथम यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र यातील गंभीर जख्मी दस्तगीर सबाज तडवी राहणार विरावली तालुका यावल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेवुन जात असताना रस्त्यातच ते मरण पावलेत.

दरम्यान सदर अपघातास कारणीभुत ऑटो रिक्षा चालक हा अपघाताच्या स्थळावरून पसार झाला असुन , याविषयी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांकडुन संताप व्यक्त करण्यात येत असून .सदर प्रकरणी चौकशी होऊन औटो रिक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे, हिंगोली जिल्हा येथे सेवेत कार्यरत असलेले RTO आशिफ तडवी यांचे वडिल आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now