गौरी आगमनापूर्वी लाडक्या बहिणींना मोठी भेट; खात्यात येणार ३ हजार रुपये?

सप्टेंबर 15, 2026 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा असतानाच आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ladki bahin yojana

या आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी गौरींचं आगमन होणार असून याच निमित्ताने राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. त्यामुळे गौरी आगमनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीचे गिफ्ट मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दोन महिन्यांच्या हप्त्याची. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांची रक्कम एकाचवेळी जमा झाल्यास प्रत्येक पात्र महिलेला ३,००० रुपये मिळू शकतात. यापूर्वीही काही प्रसंगी दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आल्याने यंदाही गणेशोत्सवाच्या काळात अशीच भेट मिळेल, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र सरकारकडून यावेळी केवळ ऑगस्टचा हप्ता जमा केला जाणार की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात मागील महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता. आता गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ३ हजार रुपये एकत्र मिळणार की केवळ एका महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता मिळणार, याचा निर्णय शासनाच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now