६९वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह ध्वजारोहण व उद्घाटन उत्साहात साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणेचे अंतर्गत जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लि. जळगाव व सहकार खाते यांच्यावतीने 69 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह निमित्त ध्वजारोहण दलूभाऊ जैन, अध्यक्ष महावीर सहकारी बँक लि.जळगांव यांच्या हस्ते करण्यात आले.

बाल दिनाचे औचित्य साधुन भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मान्य वरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकांत देशमुख, माजी विभागीय सह. निबंधक यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदिप देशमुख, अध्यक्ष, अध्यक्ष जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लि. हे होते तर प्रमुख पाहुणे ना. गुलाबराव देवकर माजी मंत्री महाराष्ट्र शासन, संतोष बिडवाई, जिल्हा उपनिबंधक, जळगाव. जितेंद्र देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा सहकारी बँक, सतीशबापु शिंदे उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड, जे.आर.देशमुख, उपाध्यक्ष, महावीर सहकारी बैक. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थेला पारितोषिक देण्यासाठी जिल्हा सहकारी बोर्डाला रुपये एक लाख देणगी माजी उपप्रचार्य डी पी पवार यांनी दिली.

सदर कार्यक्रमास जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाचे सर्व संचालक जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी.आर.पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन सुदाम पाटील संचालक जिल्हा सहकारी बोर्ड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाचे कर्मचारी आर बी पवार , के.सी बाविस्कर , जी एस साळुंखे , जे. व्ही.सुर्वेज्.जिल्हा सहकारी बोर्ड. लि. यांनी परिश्रम घेतले.