---Advertisement---

बंद घरातून 8 लाख 20 हजारांचा ऐवज चोरीला : खेडी खुर्दची घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । जवळच असलेल्या खेडी खुर्द येथील शिक्षकाच्या बंद घरातून आठ लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची घटना 27 ते 28 ऑक्टोंबरदरम्यान घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
खेडी खुर्द येथे मुकेश धनराज पाटील (56, खेडी खुर्द, ह.मु.नथाजीवाडी, शिवाजी नगर, पुणे) हे वास्तव्यास आहेत. कामानिमित्त ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 27 ते 28 च्या मध्यरात्री साधली. चोरट्यांनी कपाटातील 40 ग्रॅम वजनाची मोहनमाळ, चार सोन्याच्या बांगड्या, 60 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच अन्य छोट्या अंगठ्या, प्रॉपर्टी कागदपत्रे, इन्शुरन्स कागदपत्र, बँक पासबुक, एटीएम कार्ड आदी साहित्य लांबवले. 28 रोजी पाटील हे गावाहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मेहुणबारे पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत.,

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---