जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून याचा गैरफायदा घेत तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविले जात असल्याचा प्रमाण सातत्याने समोर येत आहे. आशाची एक घटना जळगाव तालुक्यातून समोर आलीय. जिथे रेल्वेत मुलाला नोकरीला लावून देतो असे सांगून साडेपाच लाख रुपयांत ममुराबाद येथील शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर सोपान जावळे (वय ५५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हे शेतकरी आहे. ते परिवारासह ममुराबाद येथे वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा कुणाल प्रभाकर जावळे याला रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून सतीश दिलीप चौधरी (वय ३२), शशिकांत दिलीप चौधरी (वय २९), धर्मराज भव्य्या रमेश खैरनार (वय ३५), सरिता पंढरीनाथ कोळी (वय ४५) व पंढरीनाथ भागवत कोळी (वय ५०, सर्व रा. चहार्डी ता. चोपडा) यांनी वेळोवेळी जावळे यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण साडेपाच लाख रुपये घेतले; परंतु नोकरीला लावून दिले नाही.
दिलेले पैसे मागितले तर दिले नाही म्हणून जावळे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने तक्रारीची दखल घेत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. जावळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध बीएनस कलम ३१८ (४), ३१९ (२) कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार हे करीत आहे.