---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात GBS ने टेन्शन वाढवलं! तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजाराची लागण

gbs
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । राज्यात जीबीएस आजारामुळे चिंता वाढली असून या आजाराने जळगाव जिल्ह्यातही हात पाय पसरत असल्याचं दिसून येत असून अशातच जळगाव शहरात एका तीन वर्षीय बालकाला ग्युलन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

gbs

शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजार झाला असून त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून, महिला रुग्णाला डिस्चार्ज दिला, तर रावेरच्या तरुणावर उपचार सुरु असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे डॉ. पाराजी बाचेवर यांनी सांगितले.

---Advertisement---

या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर तत्काळ जीएमसीचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे यांनी उपचार सुरू केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---