जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात असून आतापर्यंत या योजनेचे जानेवारीपर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. Ladki Bahin Yojana February installment

येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. जालना जिल्ह्यातील परतूरधील माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर अजित पवार बोलत होते.
राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी होती, ती आता 2.41 कोटींवर आली आहे. या पाच लाख महिलांमधील 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहन आहेत किंवा त्या नमो शेतकरी योजना किंवा अन्य काही सरकारी योजनांचा सुद्धा लाभार्थी आहेत. 2.3 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधीच अनुदान घेत होत्या. सरकारने पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि पहिल्याच फेरीत 5 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले.