जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोन्यासह (Gold Rate) चांदीच्या (Silver Rate) किमतीत मोठी वाढ झालीय. देशात सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात नवनवीन रेकॉर्ड (Record) पाहायला मिळाली. दरम्यान , काल (दि १७) दिवसभरात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. Jalgaon Gold Silver Rate Today

रविवारी ८६२०० रुपयावर असलेला २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी सायंकाळी विनाजीएसटी ८५७०० रुपयावर पोहोचला. म्हणजेच सोमवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा ५०० रुपयांची घसरण दिसून आली. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९८००० रुपये इतका आहे. जीएसटीसह चांदीचा दर एक लाखावर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सततची दरवाढ दिसून आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचा दर वाढताना दिसत आहे. १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ७६८०० रुपयावर होता. त्यात आजच्या तारखेपर्यंत तब्बल ९००० हजार रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. दर चांदी दरात तीन ते साडेतीन हजार रुपयाची वाढ दिसून आलीय.
कमकुवत अमेरिकी डॉलर आणि ट्रम्प टॅरिफ धोरणांमुळे सोन्याच्या किमतीत तेजी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याची स्थिती पाहता सोन्याचा दर लवकरच ९० हजार रुपयाचा पल्ला गाठू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.