---Advertisement---
जळगाव जिल्हा

‘त्या’ अपहरणकर्त्या पोलिसाने सांगितली उमर्टीतील थरारक हल्ल्याची आपबिती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात घडली येथे शनिवारी (दि १५) अवैध शस्त्रसाठा प्रकरणात कारवाई करताना पोलिसांनी पप्पीसिंग या आरोपीस जाळ्यात घेताच त्याने आरडाओरड केली. त्यामुळे पार उमर्टीमधील तीस ते चाळीस जणांचा जमाव आमच्याकडे चालून आला. त्यांनी थेट हल्ला पोलिसांवर हल्ला केला. तर एका पोलिसाचं अपहरण करून नंतर सोडले. दरम्यान अपहरणकर्ते पोलिस नाईक शशिकांत पारधी यांनी उमर्टी येथील या थरारक हल्ल्याची आपबिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याजवळ कथन केली.

Maharashtra Police Bharati 2022

मी आरोपीची घट्ट मिठी सोडत नव्हतो. आपण आरोपीस आमच्या इतर सहकाऱ्यांच्या ताब्यात देत त्यांचा सामना केला. त्या जमावाने मात्र मला पकडून दचाकीवर बसवले व मध्यप्रदेशातील जंगलात घेऊन गेले. तेथे त्यांनी माझ्या आजूबाजूला फायरिंग करीत धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपी पप्पीसिंगला सोडा तरच आम्ही पोलिस सोडतो असे त्यांनी फोनवरून धमकावले. परंतु माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु आरोपीस सोडू नका असे आपण वरिष्ठांना सांगितले.

---Advertisement---

रात्री साडेनऊ वाजता वरला पोलिस येताच त्यांनी मला सोडले अशी थरारक आपबिती अपहरणकर्त्याच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस नाईक शशिकांत पारधी यांनी केली. उमर्टी येथे अवैध शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपीला सोडावे, यासाठी ३० ते ४० जणांनी शनिवारी रात्री हल्ला करीत चक्क पोलिसाचे अपहरण केले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---