---Advertisement---
बातम्या

संविधान @७५ दिनदर्शिका समाजास प्रेरक; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

ketki p
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२५ । भाजपा संघटन पर्व – उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेसाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले असता त्यांना महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी संविधान @७५ दिनदर्शिका भेट दिली. दिनदर्शिकेचे अवलोकन करून उत्तम व समाजास प्रेरक ठरेल अशी दिनदर्शिका आहे, असे श्री बावनकुळे म्हणाले.

जळगाव येथील छत्रपती संभाजी नाट्यगृहात शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्राची भाजपा संघटन पर्व – विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ह्या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे, ना. गिरीश भाऊ महाजन, आमदार विक्रांतजी पाटील, राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, खासदार स्मिता ताई वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेनंतर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मान्यवरांची भेट घेऊन संविधान @७५ दिनदर्शिका दिली. यावेळी अतिशय सुबक मांडणी तसेच सोप्या शब्दात संविधानाची मांडणी असल्याबद्दल कौतुक करण्यात आले. हि दिनदर्शिका सर्व सामान्य तसेच शाळकरी मुले, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणारी असल्याचे प्रतिपादनही बावनकुळे यांनी यावेळी केले .

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---