⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

यावल एसटीबीटी बांधकाम रस्ते निकृष्ट दर्जाचे; चौकशीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगरपरिषद हद्दीत विकसित भागात भास्करनगर, गुरुदत्तनगर, गणेशनगर भागात नगरपरिषदे मार्फत एसटीबीटी रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील राजेश कडू महाजन यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या हद्दीत नवीन वसाहतीत जे काँग्रेटी रस्ते व गटारीचे काम झाले आहेत. ते इस्टिमेट नुसार झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शिवाय रस्त्याचे इस्टिमेट मध्ये वेगवेगळ्या आकाराची म्हणजे ८,१०,१२,२६ निरनिराळ्या डायमीटरची आसारी वापरलेली असून ती फाउंडेशन बिम कमानी व इतर अशा ठिकाणी साधारण ८ हजार ९७६ किलो जवळजवळ ९ मेट्रिक टन एवढी आसारी इस्टिमेट मध्ये दाखवलेली आहे. आसारी व वरील प्रमाणे ऍटम हे डांबरी रस्ते व गटारी साठी वापरतात का? कामाचे इस्टिमेट हें अपाचे आर्थिक नुकसान करणारे आहे. या कामांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या प्रकरणा संदर्भात माहिती अधिकारात मिळालेली माहिती प्रत्यक्ष बघितली असता. यावल नगरपरिषदेतर्फे जे प्रमाणपत्र जोडण्यात आले आहेत. या प्रमाणपत्रावर यावल नगरपरिषद कार्यालयातील जावक क्र. आणि दि. नसल्याने संबंधितांनी मद्यपान करून बिल अदा केले असावेत का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेश कडू महाजन यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.