जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

ऑगस्ट 1, 2026 12:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या जामनेर तालुक्यातील वडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, फत्तेपूर पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे.

prashant chaudhari

मृत तरुणाचे नाव प्रशांत सुभाष चौधरी (वय २९) असे आहे. तर या प्रकरणातील आरोपी अभिषेक संतोष मोरे याला फत्तेपूर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि आरोपीची बहीण यांनी काही काळापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग आरोपी अभिषेक मोरे याच्या मनात होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून आरोपीने प्रशांतवर दगडाने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात प्रशांत चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now