जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट क्लर्क या पदांच्या तब्बल ११,४०३ रिक्त जागांसाठी भरती प्रोसेस सुरू केली आहे. क्लर्क पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज, म्हणजेच १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. IBPS Clerk Bharti

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या उमेदवार २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज भरू शकतात. उमेदवारांना दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाईल. या भरतीद्वारे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक यांसह विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.IBPS Clerk Recruitment

पदाचे नाव : क्लर्क
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट :
उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देखील उपलब्ध आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना ५ वर्षांची, इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत मिळेल.
नोंदणी शुल्क
अर्ज करण्यासाठी नोंदणी शुल्क आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ₹१७५ आहे, तर अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ₹८५० आहे.
किती पगार मिळेल?
बँक क्लर्क या पदासाठी निवड झाल्यानंतर, उमेदवारांना दरमहा ₹24,050 ते ₹64,480 इतके मूळ वेतन मिळेल. याव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि लाभांचाही फायदा होईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक पगारात आणखी वाढ होईल.












