⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

World Sex Workers Day : ‘रेड लाईट एरीया’वर आले आहेत अनेक सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या लिस्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जगभरात २ जून हा जागतिक ‘सेक्स वर्कर्स डे’ म्हणून ओळखला जातो. यादिवशी भारतासह संपूर्ण जगात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना होणारा त्रास, त्यांना भोगावे लागणारे कष्ट हे जाणून घेण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतीय सिनेसृष्टीने आजवर कित्येक सिनेमे याच महिला भगिनींच्या आयुष्यावर चित्रित करून प्रदर्शित केले आहेत. काही चित्रपट सुपरहिट झाले तर काहींना मोठमोठे पुरस्कार देखील मिळाले. बॉलीवूडच्या रेड लाईट एरियावर आधारित चित्रपटांची यादी तशी फार मोठी नाही, त्यापैकी काही चित्रपटांची यादी आजच्या दिनानिमित्त आम्ही आपणास देत आहोत.

हे देखील वाचा : ‘ती’ने देह विक्री केली, बहिणीचे शिक्षण पूर्ण केले, स्वतःचा नवा संसार थाटला आणि आज तिला अभिमान आहे ‘वेश्या व्यवसायाचा’

चांदनी बार
2001 साली आलेला चांदनी बार हा चित्रपट मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील मेळाला. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका ही अभिनेत्री तब्बू हिने गाजवली आहे. चित्रपटामध्ये तब्बू मुमताज या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीची भूमिका करते. या चित्रपटातून तिने सर्वांचीच मने जिंकली.यात अतुल कुलकर्णी यांनी केलेला अभिनय देखील अतुलनीय आहे.

chandani bar

बेगम जान
भारत पाकिस्तान फाळणी वेळी भारतात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय बाबतची कथा सांगणारी फिल्म म्हणजे बेगम जान. या चित्रपटांमधून विद्या बालन या व्यवसायाच्या प्रमुखाची भूमिका रेखाटली आहे. या चित्रपटाला सर्वच नागरिकांनी चांगलीच पसंती दिली. प्रत्येका भारतीय नागरिकांनी आणि हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. फाळणी वेळी सर्वसामान्य भारतीयांना त्रास झालाच पण तो वेशांना देखील झाला हे सांगणारा हा चित्रपट आहे.

begam jaan

लक्ष्मी
लक्ष्मी सिनेमा हा एका लहान मुलीवर असून ती वेश्या व्यवसाय इकडे कशाप्रकारे ओढली जाते याबाबतची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. लक्ष्मी या मुलीला किडनॅप केले जातं व त्यानंतर तिला वेश्या व्यवसायात झोकून दिले जात. याबाबतचा हा सिनेमा आहे प्रत्येकाने हा सिनेमा बघितलाच पाहिजे. लहान मुलांसोबत हा चित्रपट पाहू नये.

lakshami

प्यासा
१९५७ साली आलेला हा चित्रपट स्वातंत्र्यानंतर वेश्याव्यवसायावर सर्वात पहिला चित्रपट आहे. दत्त यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण भारताने या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. गुलाबी नावाच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली बाबत हा चित्रपट आहे.

pyasasa

चमेली
करीना कपूर हिला या चित्रपटासाठी पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. एका माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते व त्यानंतर तो माणूस कशाप्रकारे एका वेश्येच्या प्रेमात पडतो याबाबत हा चित्रपट होता.

chameli

गंगुबाई काठियावाडी
कामाठीपुरा येथे असलेल्या तरुण वेश्यांचे कसे हाल होतात हे सांगणारा चित्रपट म्हणजे गंगुबाई काठियावाडी. या चित्रपटात गंगुबाई म्हणेजच आलीया भट हिला विकले जाते. नंतर तिच्यावर अत्याचार केला जातो पण ती एक मोठी नेता बनते हे चित्रपटाद्वारे सांगण्यात आले आहे.

gangubai