जळगाव लाईव्ह न्युज। २२ एप्रिल २०२२। जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत विद्यापीठ संघ आणि एसएसबीटीतील विद्यार्थिनी तनुश्री फुलझाडे व सुमित पाटील या खेळाडूंनी कांस्य पदक पटकाविले.
जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व एसएसबीटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बिसीए विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थी तनुश्री फुलझाडे हिस महिला संघात कांस्यपदक ( मिनी गोल्फ) व सुमित संतोष पाटील (मिनी गोल्फ) यास पुरुष डबल विभागात कांस्य पदक मिळाले.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील, क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल अभिनंदन केले. या खेळाडूना क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.