जळगावात देशी बनावटीच्या पिस्तूल अन् काडतुसांसह तरुण जेरबंद

ऑगस्ट 11, 2026 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शनीपेठ पोलिसांनी जळगाव शहरातील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरातून एका इसमाला देशी बनावटीच्या पिस्तूलासह ताब्यात घेतले. प्रकाश तोलार (रा. खेडी, ता. जळगाव, हल्ली रा. साई सिटी, जळगाव) असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

gs

जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई

१० ऑगस्ट २०२६ रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने संबंधित ठिकाणी रवाना झाले. तेथे प्रकाश तोलार याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

यांनी केली कारवाई?

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक/संतोष खेडेकर, परि. पोलीस उप निरीक्षक/अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उप निरीक्षक/नितीन पाटील, पोहेकॉ/विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोना/ महेंद्र पाटील, पोना/पराग दुसाने पोकॉ/अमोल वंजारी, पोकॉ/निलेश घुगे, पोकॉ/गणेश ढाकणे, पोकॉ योगेश साबळे यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now