डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १२ ते १८ ऑगस्टदरम्यान अँटी-रॅगिंग सप्ताह

ऑगस्ट 12, 2026 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि रॅगिंगमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव खुर्द येथे १२ ते १८ ऑगस्ट २०२६ दरम्यान अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा अँटी-रॅगिंग डे, तर १२ ते १८ ऑगस्ट हा अँटी-रॅगिंग सप्ताह म्हणून पाळला जातो.

GH

२०२६ साठी युजीसी राष्ट्रीय रॅगिंग-विरोधी देखरेख संस्था आणि सेंटर फॉर यूथ यांनीही या कालावधीत जनजागृतीपर उपक्रम, स्पर्धा आणि विविध विद्यार्थी सहभागात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग कमिटीतर्फे सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट रोजी अँटी-रॅगिंग डे, १३ ऑगस्ट रोजी सेमिनार, १४ ऑगस्ट रोजी शॉर्ट फिल्म प्रदर्शन, १५ ऑगस्ट रोजी जनजागृती रॅली, १६ ऑगस्ट रोजी पोस्टर प्रेझेंटेशन, १७ ऑगस्ट रोजी स्लोगन प्रेझेंटेशन, तर १८ ऑगस्ट रोजी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे दुष्परिणाम, त्याविरोधातील नियम तसेच सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सहजीवनाबाबत जागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी रॅगिंगला विरोध करून “रॅगिंगबाबत शून्य सहिष्णुता’ या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासन आणि अँटी-रॅगिंग कमिटीने केले आहे. रॅगिंगला नकार — सुरक्षित शिक्षणाला स्वीकार या संदेशातून सप्ताह यशस्वी करण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now