सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा भडका; जळगावात दोन दिवसांत तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ?

ऑगस्ट 12, 2026 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीचे दिवस अगदी जवळ आले असताना सोन्यासह चांदी दरात तेजी पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरातील तेजी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार ५४५ रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ३ हजार ९० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव १ लाख ५७ हजार १७८ रुपये प्रति तोळा, तर चांदी २ लाख ४५ हजार १४० रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.

goldsilver

यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याचा दर १ लाख ५५ हजार ६३३ रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर २ लाख ४२ हजार ०५० रुपये प्रति किलो होता. त्यात मंगळवारी पुन्हा मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात १ हजार ६४८ रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार १४७ रुपयांची वाढ झाली आहे.

दोन महिन्यांनंतर पुन्हा उच्चांकाच्या दिशेने

सोन्या-चांदीच्या दरांनी सुमारे सव्वादोन महिन्यांनंतर पुन्हा या पातळीवर मजल मारली आहे. यापूर्वी ५ जून रोजी सोन्याचा दर १ लाख ५७ हजार ७९६ रुपये प्रति तोळा, तर ८ जून रोजी चांदीचा दर २ लाख ५२ हजार ३५० रुपये प्रति किलो इतका होता. त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती.मात्र आता पुन्हा बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे. सोमवारी चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर मंगळवारीही त्यात आणखी तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोने दरवाढीचे कारण?

जागतिक बाजारात सोन्याच्या दराला मिळणारा आधार ही सध्याच्या तेजीमागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनसह विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्याने खरेदी सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी मजबूत राहून त्याच्या दराला आधार मिळत आहे. जागतिक बाजारातील या घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही होत असून, त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि डॉलरच्या हालचालींवर सोन्या-चांदीच्या दराची दिशा अवलंबून राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now