जळगावात सर्वमंगल आरोग्य सप्ताहाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । शहरातील सर्वमंगल नेत्रालय, डायबिटीज, थायरॉइड, एंडोक्राइन सेंटर, विवेकानंद नगर, इंडिया गॅरेज जवळ, स्वातंत्र्य चौक, जळगाव, येथे सर्वमंगल आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सप्ताह १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. यात नोंदणी शुल्क २० रुपये असून माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपलब्द तपासण्या
थायरॉइड, डायबिटीज व किडनीची रक्त तपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, लठ्ठपणासाठीचे बॉडिमाक्स इंडेक्स (BMI) या तपासण्या केल्या जाणार आहेत.

रक्त तपासणीवर आकर्षक सुट
रक्त तपासणीवर आकर्षक सुट देण्यात येणार असून फक्त ३०० रुपयात रक्त तपासणी केली जाणार आहे.

WhatsApp Image 2022 11 12 at 14.28.50
जळगावात सर्वमंगल आरोग्य सप्ताहाचे आयोजन 1