⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर राज्यपालांनी केला ‘हा’ खुलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshnyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेर्धात राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. दरम्यान,जळगावमध्ये या वक्तव्यावर राज्यपालांनी खुलासा केला आहे. आपण इतिहासाच्या तथ्याची माहिती घेणार असल्याचे स्‍पष्‍ट राज्यपाल यांनी केलं आहे.

राज्यपाल आज जळगाव दौऱ्यावर आले आहे. आज त्यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, औरंगाबाद येथील आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वक्‍तव्‍य केले होते. या वक्‍तव्‍याबाबत त्‍यांना विचारले असता छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) हे प्रेरणास्‍थान आहेत. वाचल्‍याप्रमाणे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. परंतु, आपण इतिहासाच्या तथ्याची माहिती घेणार असल्याचे स्‍पष्‍ट केले. परंतु, त्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याबाबत माफी मागणार का? या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले.

पहा व्हिडिओ :

हे देखील वाचा :