जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथे ब्राह्मण समाज आणि पुरोहित संघाच्या वतीने अमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी ब्राह्मण समाज आणि पुरोहित संघ यांच्या वतीने चाळीसगाव पोलिस ठाण्यात जावून पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. इस्लामपूर येथील सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी कन्यादान आणि पूजा विधी यावर जे मिश्किल भाष्य केले त्यांच्या त्या वक्तव्याचा आणि अमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आला. त्यांनी समाजाची माफी मागावी व असे वक्तव्य पुन्हा करू नये, याविषयी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी ब्राह्मण पुरोहित संघ, ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.