लाडक्या बहिणींसाठी अखेर ‘गोड बातमी’! अदिती तटकरेंची मोठी घोषणा, लाखो महिलांचे टेन्शन मिटले!

जुलै 26, 2026 6:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल सहा महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली असून यामुळे ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.

ladki bahin

गेल्या काही दिवसांपासून e-KYC च्या प्रक्रियेवरून लाभार्थी महिलांमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. e-KYC वेळेत पूर्ण न झाल्यास योजनेचा मासिक हप्ता बंद होईल की काय, अशी भीती महिलांच्या मनात होती. मात्र, मंत्री अदिती तटकरे यांनी हा संभ्रम पूर्णपणे दूर केला आहे.

ज्या महिलांनी e-KYC ची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे ती पूर्ण होऊ शकलेली नाही, अशा सर्व महिलांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे.

हप्त्याची रक्कम वाढणार का?

लाडकी बहीण योजनेतील मासिक आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्याबाबत विचारले असता तटकरे म्हणाल्या की, “याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या राज्य सरकारचे संपूर्ण लक्ष ही योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्यावर केंद्रित आहे.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now