अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जळगाव जिल्ह्यातील ५३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध!

जुलै 26, 2026 5:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्राप्त झाली असून जळगाव जिल्ह्यातील एकूण 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे.

farmer

या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव, संस्थेचे कार्यालय तसेच बँक स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन अग्रीस्टॅक नोंदणी करावी.

कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्र तसेच बँकेच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी यासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now