काटे दाम्पत्याने केला रेकॉर्ड, मोदींची रेखाटली वेगवेगळी ७५ चित्रे

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७५ वेगवेगळी चित्रे डॉ. अविनाश काटे यांनी तयार केली. आज पर्यंत संपूर्ण जगात कोणीही एका व्यक्तीचे इतके चित्रे बनविले नाही. मोदीजी हे भारताचे प्रतिनिधी आहेत म्हणून हे पोर्ट्रेट त्यांना काटे दाम्पत्य लवकरच भेट देणार आहेत.

या एका चित्राची साईज 2×1.5 फूट असून ते कॅनव्हासवर ऑइल व ॲक्रीलिक कलर मध्ये तयार केलेले आहे.यामध्ये मोदीजीं च्या विविध अभिव्यक्ती साकारल्या आहेत. संपूर्ण जगात हा एक विशेष व अनोखा उपक्रम असल्यामुळे याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून डॉ. अविनाश काटे यांना “वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स ” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

या गौरवाने जळगाव खानदेश महाराष्ट्राचे नाव संपूर्ण जगात उंचावले जात आहे. या यशामागे त्यांनी त्यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा व आपल्या जळगाव परिवारा सोबत सध्या कार्यरत जैन यूनिवर्सिटी बेंगलुरू, कर्नाटक याचे आभार मानले आहे.