मद्यप्रेमींना मोठा धक्का! ओल्ड मॉन्क, बॅगपाइपरसह ‘या’ प्रसिद्ध ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; कारण काय?

ऑगस्ट 4, 2026 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तळीरामांच्या आवडत्या मद्य ब्रँड्सच्या काही विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर थेट बंदी घातली आहे. यामध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज, अँटीक्विटी ब्ल्यू सारख्या नामवंत मद्याचा समावेश आहे. या पावलामागे या मद्यात आर्टिफिशियल फ्लेवर आढळले असून ते मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्सच्या नुसार नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहै.

old monk

FSSAI च्या तपासात काही मद्य उत्पादक कंपन्यांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरीत्या परिपक्व (Aged) झाल्यासारखा स्वाद आणि सुगंध देण्यासाठी कृत्रिम फ्लेवरचा वापर केल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमानुसार रम, व्हिस्की, ब्रँडी आणि जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांचा स्वाद व सुगंध हा उत्पादन प्रक्रियेतून आणि मूळ घटकांमधूनच तयार झाला पाहिजे. कृत्रिम फ्लेवरचा वापर नियमांशी विसंगत असल्याचे FSSAI चे मत आहे.

कोणत्या उत्पादनांवर कारवाई?

मध्य प्रदेशाताली युनायटेड स्पिरिट्सने तयार केलेल्या एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रु बिवरेजेसने तयार केलेली बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, मॅकडॉवेल्स नं. १ रम आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रमच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने तयार केलेली ओल्ड माँकच्या तीन व्हेरिएंटवर निर्बंध लागू केले आहे. ही बंदी येथे खास तयार झालेल्या प्रोडक्ट्सवर लागू असेल की अन्य जागी तयार झालेल्या याच ब्रँड्सवरही देखील लागू असणार याबाबत स्पष्टीकरण झालेले नाही.

दरम्यान, संबंधित कंपन्यांनी सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला आहे. काही कंपन्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असून हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेपेक्षा नियमांच्या व्याख्येशी संबंधित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णय येईपर्यंत काही ठिकाणी संबंधित उत्पादनांची विक्री तात्पुरती प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now