जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२६ । सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवसाच्या दरवाढीनंतर आज सोन्यासह चांदी दरातघसरण झाली. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात घट नोंदवली गेल्याचे दिसून आले. यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला. Gold Silver Price Today

काय आहे सोन्याचा दर
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोने दरात ५१५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ०७९ रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी सोमवारी १४४२ रुपयांची तर मंगळवारी ७२१ रुपयांची तर काल बुधवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ५९४ रुपयांपर्यंत पोहचले होते.

चांदीचा दर
दुसरीकडे आज गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यावर ३०९० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रुपयांवर पोहोचले. यापूर्वी सोमवारी ११ हजार ३३० रुपयांची तर मंगळवारी १०३० रुपयांची तर बुधवारी दिवसभरात आणखी १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत पोहचले होते.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने व चांदीच्या वायदा दरातही नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत, डॉलरच्या मूल्यातील हालचाल आणि नफा वसुलीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दरम्यान, आज दर घसरले असले तरी अद्यापही सोन्यासह चांदीचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.











