गणेशोत्सवाआधी सोनं झालं स्वस्त! आज दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घट

सप्टेंबर 7, 2026 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल ६५० रुपयांची घट झाली असून, आजचा दर १ लाख ५४ हजार १५० रुपये इतका झाला आहे.

gold jpg webp

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच आज झालेल्या घसरणीमुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः गणेशोत्सव, आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची मानली जात आहे.

चांदीच्या दरात मात्र बदल नाही

दरम्यान, चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून विशेष बदल झालेला नाही. चांदीचे दर जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. आज चांदीचा दर प्रति किलो २,५०,००० रुपये इतका आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली घट आणि चांदीच्या स्थिर दरामुळे सराफ बाजारातील ग्राहकांच्या हालचालींकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now