सोने पुन्हा महागले, चांदीही कडाडली; जळगावात १ तोळ्याचा दर पोहोचला ‘इतक्या’ रुपयांवर?

सप्टेंबर 8, 2026 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलामुळे देशांतर्गत सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, जळगाव शहरातील सराफ बाजरात आज मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. याचबरोबर ३ दिवसांपासून स्थिर असलेल्‍या चांदीच्‍या दराने आज चांगलीच उसळी घेतली.

gold silver 1 jpg webp

आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची वाढ झाली. तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

काय आहेत सोने-चांदीचे दर?

जळगाव सराफ बाजारात काल सोमवारी १ तोळा सोन्याचे दर विनाजीएसटी १ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर होते. या सोन्याच्या दरात आज १००० रूपयांची वाढ होऊन हे सोनं १ लाख ५२ हजार ५०० रुपयांवर आले आहे. तर मागील ३ ते ४ दिवसांपाासून स्‍थिर असलेल्‍या चांदीच्‍या दरात आज तब्बल ३००० रूपयांची वाढ झाली. यामुळे १ किलो चांदीचे विनाजीएसटी दर २ लाख ३६ हजार रुपयांवरून २ लाख ३९ हजार रूपयांवर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि त्याचा देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे आगामी काळात दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमतीतील वाढीकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत बाजारातील दर कोणती दिशा घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now