जळगाव लाईव्ह न्यूज । सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारादरम्यान आज जळगावच्या सराफ बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही प्रतिकिलो २ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे बाजारात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस काहीसा फायदेशीर ठरला आहे.

घसरणीनंतर आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ५७ हजार ७५ रुपये इतका झाला आहे. तर जीएसटीसह एक किलो चांदीचा दर २ लाख ४३ हजार ८० रुपये झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याकडे ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.











