रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन विशेष गाड्यांना मुदतवाढ

सप्टेंबर 13, 2026 1:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशात सणासुदीचे दिवस सुरु झाले असून या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.यामध्ये साई नगर शिर्डी–बिकानेर, उधना–झंझारपूर आणि उधना–मधुबनी या विशेष गाड्यांचा समावेश असून रेल्वेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि बिहारदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

train

उधना–झंझारपूर मार्गावर अतिरिक्त सेवा

उधना–झंझारपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०४७चे परिचालन पूर्वी १३ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित करण्यात आले होते. आता या गाडीला २७ सप्टेंबर २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. झंझारपूर–उधना परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०९०४८ आहे. या गाडीचे परिचालन पूर्वी १४ सप्टेंबर २०२६पर्यंत निश्चित करण्यात आले होते. आता ही विशेष गाडी २८ सप्टेंबर २०२६पर्यंत धावणार आहे. बिहार आणि गुजरातदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असून, नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी करण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.

साई नगर शिर्डी–बिकानेर या तारखेपर्यंत धावणार

साई नगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०४७१६च्या परिचालन कालावधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. ही गाडी पूर्वीच्या नियोजित कालावधीनंतरही धावणार असून, आता ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत तिचे परिचालन करण्यात येणार आहे. या गाडीच्या परतीच्या प्रवासासाठी बिकानेर–साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०४७१५ चालविण्यात येते. या गाडीच्या परिचालनालाही मुदतवाढ देण्यात आली असून, ती ३ ऑक्टोबर २०२६ ते २८ नोव्हेंबर २०२६पर्यंत धावणार आहे. या सेवेमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः सणासुदीच्या काळात अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.

उधना–मधुबनी साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०४५च्या परिचालन कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. ही गाडी पूर्वी १३ सप्टेंबर २०२६पर्यंत अधिसूचित होती. आता तिचे परिचालन २७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मधुबनी–उधना साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०४६च्या परिचालनालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. परतीची ही गाडी पूर्वी १४ सप्टेंबर २०२६पर्यंत धावणार होती. आता ती २८ सप्टेंबर २०२६पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र–राजस्थान, गुजरात–बिहार आणि गुजरात–झंझारपूर या मार्गांवरील प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवेचा लाभ मिळणार असून, विशेषतः आगामी गर्दीच्या काळात नियमित रेल्वे गाड्यांवरील प्रवासीभार कमी करण्यास या सेवांची मदत होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now