नूतन मराठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १० रोजी आंतरराष्ट्रीय व्याख्यान

एप्रिल 8, 2022 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ एप्रिल २०२२ | नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या माननीय डॉक्टर सुजाता सिंघी यांचे साउंड अँड म्युसिक अज अ मेडिसिन या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान १० एप्रिल रोजी संध्याकाळी ५:३० वाजता कांताई सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.

nutan jpg webp

डॉ. सुजाता सिंघी या आंतरराष्ट्रीय लेखिका, वक्त्या, कॉर्पोरेट वेलनेस, लिडर शिप ट्रेनर तसेच साउंड ऍण्ड स्पिरिचुअल सायंटिस्ट आहेत. खान्देशात पहिल्यांदाच त्यांचे व्याख्यानाचे आयोजन होत आहे. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सुजाता सिंधी यांच्या Reclaim Your Riches या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now