⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भाजपाला सत्तेतून खेचायचे असेल तर.. – श्रीकांत ओव्हाळ

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । देशात जर भारतीय जनता पार्टीला २०२४ मध्ये सत्तेतून खाली खेचायचे असेल तर समविचारी छोट्या छोट्या संघटना पक्ष यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज जर बघितलं तर ३४% मतदार फक्त भाजपाच्या बाजूने आणि विरोधात ६४% इतर पक्षांच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ यांनी केले.

मुक्ताईनगरात काल सोमवारी रोजी बहुजन मुक्ती पार्टीची जनसंवाद सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तसेच श्रीकांत ओव्हाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. ओव्हाळ पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांना भोंग्याचा त्रास होतो आणि ते सांगण्यासाठी ते भोंग्या मधूनच बोलतात. स्वतः च्या मुलांना हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पाठवणार का ? असा सवाल देखील त्यांनी केला. या देशात बीजेपीच्या विरोधात बोलले तर त्यांना ईडीचा धाक दाखवला जातो, हिम्मत असेल तर ईडीच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आमच्या घरी येऊन एक वेळेस बघावे. असे ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी यावेळी चांगलेच खडे बोल सुनावले, तसेच शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा त्यांनी समाचार घेतला.

दरम्यान, बहुजन नेत्यांना गोपीनाथ मुंडे, आरआर पाटील, विनायक मेटे.. बहुजन समाजासाठी झटणारे नेते होते, त्यांना कशाप्रकारे संपवले गेले. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर चे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे आज काय छळ चालू आहे. असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. तसेच बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यास या सर्वांचा आम्ही उलगडा केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी जाहीरित्या सांगितले.

बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ यांच्या नेतृत्वात दिनांक 2 फेब्रुवारी 2022 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनसंवाद परिवर्तन यात्रेचा झंजावात सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात कॉर्नर सभा तसेच जाहीर सभेद्वारे श्रीकांत ओव्हाळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव खेड्यापर्यंत बहुजन मुक्ती पार्टीची पुढील मोर्चा बांधणी करत आहेत. त्याचा अनुषंगाने काल सोमवारी रोजी मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा आल्यानंतर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी श्रीकांत ओव्हाळ यांचे स्वागत केले. याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुकाध्यक्ष ब्रिजलाल इंगळे, शांताराम बेलदार, जगदीश पाटील, सिद्धार्थ हीरोळे, सुपडा हिरोळे, निलेश वानखेडे, अरुण जाधव , कैलास पाटील, संभाजी ब्रिगेडचे मंगेश काटे, राजेश ढगे, पारस हिरोळे, देवलाल तांबे, राजू कोळी, विजेंद्र कोळी, सुमित हीरोळे, सचिन हीरोळे, नितीन गाढे आदी उपस्थित होते.