एक दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदी दरात पुन्हा मोठी वाढ; ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

फेब्रुवारी 27, 2026 3:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२६ । सोने आणि चांदी दरात चढ-उतार कायम आहे. जळगाव शहरातील सराफ बाजारात मागच्या तीन दिवसाच्या दरवाढीनंतर काल सोन्यासह चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा वाढ नोंदविण्यात आल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.

gold silver 1

काय आहेत सोन्याचा दर?

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ३०९ रुपयांनी वाढला. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी गुरुवारी दिवसभरात ११३३ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ४६१ रुपयांपर्यंत खाली आले होते.

चांदीचा दर

दुसरीकडे आज सकाळी बाजार उघडल्यावर चांदी दरात तब्बल ८२४० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल दिवसभरात तब्बल ८२४० रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली आले होते.

दरवाढीचे कारण काय?
अमेरिका–इराण तणाव आणि आता पाकिस्तान-अफगाण संघर्ष सुरू असल्यामुळे जागतिक तणाव कायम असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. परिणामी भाव वाढताना दिसत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now