Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

सोने पुन्हा महागले, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे भाव

gold

Image Credit : ansjewelry.com

चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 1, 2022 | 11:55 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोबत चांदीही महागली आहे. आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ६४० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात किंचित ८० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने १५० रुपयाने तर चांदी ४७० रुपयाने महागले होते.

आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७९० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,०७० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या. युद्धामुळे गेल्या महिन्यात सोने दोन वर्षाच्या उच्चांक पातळीवर गेले होते. ९ मार्चला सोने ५५ हजारावर गेले होते. मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली.

या आठवड्याच्या सुरुवातीपासून सलग तीन दिवस सोने आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोने चांदी पुन्हा वाढू लागली आहे. मागील तीन दिवसाच्या घसरणीच्या सोने १३०० रुपयापर्यंत स्वस्त झाले होते. तर चांदी २४०० रुपयांपर्यंत स्वस्त झाली होती. मात्र या दोन दिवसात सोने ७९० रुपयाने महागले आहे. तर चांदी ५५० रुपयाने वधारली आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,०९० रुपये होते. तर २९ मार्च रोजी ५२,७८०, ३० मार्च रोजी ५२,०००, तर ३१ मार्च ५२,१५० प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे २८ मार्च ला चांदी ७०,४५० प्रति किलो होती. २९ मार्च ६९,७००, ३० मार्च ६८,५२०, तर ३१ मार्च ला ६८,९९०,रुपये प्रति किलो इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in सोने - चांदीचा भाव
Tags: चांदीसोने
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
gudhi padva

२ एप्रिलला गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन

MLA patil

पाचोऱ्यात आमदार पाटीलांच्या हस्ते गावठाण मोजणीस प्रारंभ

Paytm Cashback

पेटीएम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! पैसे न भरता IRCTC वर बुक करा ट्रेन तिकीट, कसे ते जाणून घ्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.