ग्राहकांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला; जाणून घ्या नवीन दर?

ऑगस्ट 10, 2026 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२६ । आगामी सणासुदीचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपले असून सण म्हटला की सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदीही आलीच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने ग्राहकांचे लक्ष दररोजच्या भावाकडे लागले आहे. अशातच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

gold silver jpg webp

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ४३० रुपये प्रति तोळा घट झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत असताना आज अचानक दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Goodreturnsच्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४३० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरातही ३३० रुपयांनी घट झाली आहे.

आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोनं : १,५२,१२० रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोनं : १,३९,४५० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोनं : १,१४,१३० रुपये प्रति १० ग्रॅम

दरम्यान, चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव २४५ रुपये प्रति ग्रॅम, तर १ किलो चांदीचा भाव २,४५,००० रुपये इतका आहे. श्रावण आणि त्यानंतर येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी चढ-उतार होतात का, याकडे ग्राहक आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now