वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळ; चोपडा अन् भुसावळात दोन बोगस डॉक्टर गजाआड

ऑगस्ट 10, 2026 10:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. चोपडा तालुक्यातील वटार येथे एका व्यक्तीवर, तर भुसावळ शहरात एका क्लिनिकचालकावर पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही प्रकरणांत संबंधितांकडे वैध वैद्यकीय पदवी नसल्याचे आढळून आल्याने पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

doctor jpg webp

वटार येथे बोगस डॉक्टर रंगेहात

चोपडा तालुक्यातील वटार येथे १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी एक वाजता पोलिस पथकाने पंचांसह मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी अरुपकुमार अजय कुमार आढळ (वय ४१, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल, ह.मु. वटार) हा कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसताना रुग्णावर ॲलोपॅथिक औषधे व इंजेक्शनद्वारे उपचार करताना आढळून आला.

त्याने सादर केलेली Council of Vocational and Research Training आणि Nikhil Bangiya Vidyapeeth यांची प्रमाणपत्रे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अमान्य असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. घटनास्थळावरून स्टेथॉस्कोप, विविध औषधे, इंजेक्शन्स तसेच वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now