सोने - चांदीचा भाव

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; जळगाव सराफ बाजारातील आजचे दर पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२६ । सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव सराफ बाजारात सकाळच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात सुमारे ५०० रुपयांची घट झाली होती. तसेच चांदीच्या प्रति किलो दरातही सुमारे १ हजार रुपयांची घट नोंदविण्यात आली. सलग काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढल्याचे सराफा बाजारातील व्यावसायिकांनी सांगितले.

काय आहे सोन्या-चांदीचा दर?

उपलब्ध बाजारभावानुसार २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १ लाख ४४ हजार ३३० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १ लाख ३२ हजार ३०० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १ लाख ८ हजार २५० रुपये इतका नोंदविण्यात आला. चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख ३५ हजार रुपये इतका कायम असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि जागतिक मागणी-पुरवठा यांचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील अद्ययावत दरांची खात्री करूनच व्यवहार करावेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button