जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात यंदाच्या शाश्वत जीवनाच्या निरोगी प्रारंभासाठी स्तनपान : प्रभावी सहाय्य व्यवस्थेला बळकटी देऊया या संकल्पनेवर आधारित जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पायल पंकज सांचेती यांनी पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. साक्षी, डॉ. अथर्व, डॉ. हेतांशी, डॉ. मंजिरी आणि डॉ. प्रांशकी यांच्या सहकार्याने मातांना स्तनपानाचे आई व बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी स्तनपानाची योग्य पद्धत व तंत्र, स्तनपानासंदर्भातील विविध गैरसमज व त्यामागील सत्य तसेच स्तनपान करताना आई व बाळाला आरामदायी व योग्य स्थिती मिळण्यासाठी आवश्यक एर्गोनॉमिक्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज सूर्यवंशी आणि डॉ. ऋतुजा गावंडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमात उपस्थित मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्तनपानासंदर्भातील विविध शंका व प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करून स्तनपानाबाबत योग्य माहिती व जागरूकता निर्माण केली.मातृ व बाल आरोग्य संवर्धनासाठी स्तनपानाचे महत्त्व तसेच मातांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळणार्‍या सहाय्य व्यवस्थेची गरज अधोरेखित करणारा हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button